¡Sorpréndeme!

Ratnagiri | तुळशी बौद्धवाडीचे ' राजर्षी शाहू नगर, तुळशी ' नामकरण |Rajshree Shahu Nagar | Sakal Media

2021-10-16 819 Dailymotion

Ratnagiri | तुळशी बौद्धवाडीचे ' राजर्षी शाहू नगर, तुळशी ' नामकरण |Rajshree Shahu Nagar | Sakal Media
मंडणगड (रत्नागिरी) : राज्यातील गावे, वस्त्या व रस्ते यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची नावे देण्यासंदर्भात राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ता.११ डिसेंबर २०२० रोजी निर्णय घेतला. मंडणगड तालुक्यातील तुळशी हे गाव आंबेडकर चळवळीच्या कुशीत असल्याने परिवर्तनाच्या समग्र चळवळीत ते सातत्याने अग्रेसर राहिले आहे. जात, धर्म, पद, प्रतिष्ठा नाकारून एक मानवी मूल्य समोर ठेवून भरीव मदत करण्याचे कार्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केले. सामाजिक सलोखा सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व अशोका विजयादशमीचे औचित्य साधून सम्यक फाऊंडेशन तुळशी बौद्धवाडी यांनी आपल्या वाडीचे नामकरण ' राजर्षी शाहू नगर, तुळशी ' असे केले. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात प्रथमच एखाद्या वाडीचे महापुरुषांच्या नावाने नामकरण करण्यात आलेली ही कृती येणाऱ्या काळात सामाजिक आणि इतर क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे. (बातमीदार : सचिन माळी)
#Mandangad #Ratnagiri #rajshreeshahunagar #Mandangad